Skip to content Skip to footer

रितेश जेनेलियाची जादुई जोडी दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

रितेश जेनेलियाची जादुई जोडी दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

दिवाळीत नेहमी प्रमाणे प्रेक्षक मनोरंजनाच्या मेजवानीची वाट पाहत आहेत. त्यातच कोरोनामुळे लागलेल्या लॉक डाऊनमध्ये रसिक करमणुकीच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर आधार घेतना दिसत होते. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच मनोरंजन क्षेत्रात देखील नांदी पाहायला मिळत आहेत.

कोरोनाचे संकट आणि त्यामुळे नागरिकांच्या मनातील उतरत्या भावना यांच्या पार्श्वभूमीवर उद्योजक पुनीत बालन यांनी ‘आशेची रोषणाई’ या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. ज्यातून एक चांगला सामाजिक संदेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची लोकप्रिय जोडी झळकणार आहेत. तसेच यात सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, संगीत अजय-अतुल यांचे असणार आहे.

Leave a comment

0.0/5