Skip to content Skip to footer

ध्वनी प्रभूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीसांनी गाणं थांबवावं  

ध्वनी प्रभूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीसांनी गाणं थांबवावं

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोध पक्षनेते अमृता फडणवीस यांनी येत्या गुरुवारी माझं आणखी एक गाणं रिलीज होतंय त्यावरही ट्रॉलींग करा सर्वांचं स्वागत आहे असे म्हणत अमृता फडणवीसांनी मुलाखतीत आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी केलेल्या आवाहनांचे इंटकऱ्यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. त्यांच्या नव्या गाण्याची बातमी येताच पुन्हा नेत्याकर्यांनी पुन्हा एकदा त्यांना ट्रॉल केले आहे.

 येत्या गुरुवारी अमृता यांचे नवं गाणं प्रदर्शित होत असून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे गाणं प्रकाशित केले जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी या ऑनलाइन याचिकेचे समर्थन केले आहे.

ट्रोलिंग बाबत अमृता फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या की, ट्विटर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो. तसा हक्क मी ही बजावते. अनेकदा मी माझी मत सोशल नेटवर्किंगवरुन मांडत असते. कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. हे पार्ट अ‍ॅण्ड पार्सल ऑफ लाइफ आहे, असे बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5