“आणखी किती खोटं बोलणार?” भाजपाजी पोस्टरबाजी फसताच स्वरानं केली टीका

आणखी-किती-खोटं-बोलणार-भ-How many more lies will be told
पोस्टरबाजी भाजपाच्या अंगलट! जाहिरातीतील ‘तो’ शेतकरीच देतोय दिल्लीत धरणे

नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान सरकार देखील या कृषी कायद्यांचे फायदे समजवून सांगण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्रानं यासाठी एक जाहिरात देखील केली होती. मात्र या जाहिरातीचा फज्जा उडाला आहे. कारण जो शेतकरी जाहिरातीतून नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगत होता तो देखील आंदोलन करताना दिसत आहे. दरम्यान भाजपाच्या या पोस्टरबाजीवर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील जोरदार टीका केली आहे. आणखी किती खोटं बोलणार? असा थेट सवाल तिने भाजपाला केला आहे.

“आणखी किती खोटं बोलणार? ज्या शेतकऱ्याचा फोटो भाजपानं जाहिरातीत लावला तो व्यक्ती सिंधू बॉर्डरवर सरकारविरोधात आंदोलन करत आहे. आता पोस्टर बॉय तुम्हाला कायदेशीर नोटिस बजावणार आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन स्वरानं केंद्र सरकावर टीका केली आहे. तिचं हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. तिन्ही कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार व भाजपाकडून तिन्ही कायद्यांचे फायदे पटवून देण्याचं काम केलं जात आहे. याचसाठी पंजाब भाजपानं हरप्रीत सिंह यांचा फोटो वापरून कायद्यांचे फायदे सांगणार पोस्टर तयार केलं आहे. यात हरप्रीत सिंह यांना सुखी शेतकरी म्हणून दाखवण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः हरप्रीत सिंह हेच सध्या सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात धरणे देत आहेत. हरप्रीत सिंह यांच्या या पोस्टरविषयी सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरू आहे. त्या पोस्टरवरून टीका सुरू झाल्यानंतर पंजाब भाजपानं हे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केलं आहे.

 

हरप्रीत सिंह यांचा फोटो पोस्टरवर कसा?

भाजपाने पोस्टरवर वापरलेला हरप्रीत सिंह यांचा फोटो सहा ते सात वर्षांपूर्वीचा आहे. हाच फोटो पोस्टरवर वापरण्यात आला असून, तो हरप्रीत सिंह यांच्या परवानगी विनाच वापरण्यात आलेला आहे. सिंह यांनीच हा दावा केला आहे. “मी सिंघू बॉर्डर आंदोलन करत असताना भाजपाने हा फोटो वापरला आहे,” असं हरप्रीत सिंह यांनी म्हटलं आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here