Skip to content Skip to footer

जल सिंचन झाले तरी दुष्काळ कसा हे राज साहेबांनी पवारांना विचारावे – अनिल परब

राज्यभरात नागरिकांना दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्याचे काम सुरु आहे. विरोधी पक्षातील नेते देखील राज्यभरात फिरत दुष्काळाचा आढावा घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दुष्काळाच्या परिस्थितीवरून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसिंचनाची कामे झाली म्हणतात तरी दुष्काळ कसा ? असा सवाल त्यांनी केला होता. दरम्यान, आता शिवसेना नेते अनिल परब यांनी राज ठाकरेंना उत्तर देत, जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्यांना विचारावा, असा टोला परब यांनी लगावला आहे.

दुष्काळामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार काम करत आहे. युती सरकारवर जलसिंचनात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, असं देखील परब म्हणाले. आज काँग्रेस सरकारच्या काळात दोन वेळा केंद्रीय कृषी मंत्री पद भूषविलेल्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱयांच्या हिताचे कोणते प्रश्न मार्गी लावले आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे. फक्त निवडणुका डोळ्यासमोर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱयांची सहानुभूती मिळवण्याचे काम करताना विरोधकांच्या वागण्यातून दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5