Skip to content Skip to footer

आमिरने उचलले मोठे पाऊल! लालसिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण होईपर्यंत करणार ‘ही’ गोष्ट

बॉलिवूड अभिनेता आमिर खान लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या चर्चा रंगल्या होता. आता आमिर खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटच्या प्रदर्शनापर्यंत तो त्याचा मोबाईल बंद ठेवणार आहे.

आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या कामात व्यग्र असतात मोबाईलमुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून आमिरने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. पण त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्यच वाटले आहे.

https://twitter.com/aamir_khan/status/1196289071472996352?s=20

लालसिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खान अभिनेत्री करिना कपूर खानसोबत दिसणार आहे. त्यांनी यापूर्वी ३ इडियट्स या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. आमिरचा लालसिंग चड्ढा हा चित्रपट २०२१मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आमिर तोपर्यंत मोबाईल बंद ठेवणार असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वेत चंदन करत आहेत.

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच करीना कपूर देखील या चित्रपटात पंजाबी मुलीची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच करीनाचा चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

Leave a comment

0.0/5