बी-टाऊनमध्ये सध्याच्या घडीला एक कपल खूप चर्चेत आहे. ते कपल म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा. बॉलिवूड मंडळींच्या नात्यांबद्दल अनेक उलगडे करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शो मध्ये होत असतात. अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकताच या कार्यक्रमात एक खुलासा केला आहे. तिने अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले. मलायकाने देखील एका कार्यक्रमात बोलत असताना तिच्या आणि अर्जुनच्या नात्याला कबुली दिली.
ट्विटरवर या कार्यक्रमाचा छोटा भाग शेअर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात किरण खेर, विर दास, मलायका अरोरा, आणि मलायका दुआ उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये मलायकाने एक वक्तव्य केले. ती म्हणाली, मला अर्जुन आवडतो या मार्गाने किंवा त्या मार्गाने. अर्जुन कपूर सध्या त्याच्या ‘संदीप और पिंकी फरार’,’इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ आणि ‘पानीपत’ चित्रपटांच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. ‘पानीपत’मध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी चित्रपटागृहात दाखल होणार आहे. तर दुसरी कडे मलायका तिच्या फॅशन शोमध्ये व्यस्त आहे.