Skip to content Skip to footer

‘अमिताभ बच्चन’ यांनी शेअर केला ‘सर्जरी’ नंतरचा त्यांचा पहिला फोटो, चाहत्यांचे मानले आभार

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन केवळ चाहत्यांच्या मनावरच राज्य करीत नाहीत तर त्यांच्यासाठी ते त्यांचे आयुष्य आहेत. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीशी संबंधित कोणतीही बातमी चाहत्यांना त्रस्त करण्यासाठी पुरेशी असते. बिग बी ने डोळ्यांची सर्जरी केली आहे. सर्जरीची बातमी ऐकताच अमिताभ बच्चनचे चाहते त्यांची प्रकृती ठीक होण्यासाठी प्रार्थना करीत होते. दरम्यान सर्जरीनंतर स्वत: अमिताभ बच्चन यांनी आपला नवीन फोटो शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्रामवर आपला नवीन फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. अमिताभ यांचा हा फोटो मोनोक्रोम आहे आणि सर्जरीनंतरही त्यांच्या चेहऱ्यावरील चार्म कमी झालेला नाही. अमिताभ बच्चन यांची सर्जरी यशस्वी होत आहे आणि वृत्तांनुसार ते लवकरच घरी परतणार आहेत. एका वृत्तानुसार बिग बी यांना मोतीबिंदू झाला होता, ज्याची सर्जरी करण्यात आली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बघितले तर ‘झुंड’ या चित्रपटाची फायनल रिलीज डेट समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि रिलीजच्या तारखेविषयी सांगितले. बिग बी ने आपल्या सोशल मीडियावर लिहिले की, ‘कोविड ने हमें कई झटके दिए.. लेकिन अब वापसी का समय है.. !! ‘झुंड’ 18 जून 2021 को रिलीज़ हो रही है.’ या कॅप्शनसह महानायकाने जाहीर केले आहे की हा चित्रपट येत्या १८ जून रोजी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अमिताभ रुमी जाफरी दिग्दर्शित ‘चेहरे’ या चित्रपटात एका अत्यंत मनोरंजक भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ३० एप्रिलला रिलीज होणार असल्याचे समोर येत आहे.

अमिताभ हे मेगा बजेट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ चा देखील एक भाग आहेत, ज्याची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. अमिताभ व्यतिरिक्त रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होत आहे, यामागे महानायकाचे आरोग्य हे देखील एक मोठे कारण आहे.

Leave a comment

0.0/5