Skip to content Skip to footer

मलायका अरोराला पती अरबाज खान कडून मिळालं ‘Special Gift’, अभिनेत्रीनं शेअर केला ‘व्हिडीओ’

महाराष्ट्र बुलेटिन : मलायका अरोरा नेहमी तिचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यासह, ती तिच्या व्हॅकेशन पोस्टपासून ते कुकिंग व्हिडिओपर्यंत सर्वकाही शेअर करत असते. पण आज मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर खूपच खास गोष्ट शेअर केली आहे. खरं तर मलायकाला तिच्या एक्स पती अरबाज खान कडून एक गोड भेट मिळाली आहे, ज्यामुळे मलायकाला खूप आनंद झाला आहे, हे गिफ्ट उघडताना मलायकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम-स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका आंब्याचा बॉक्स उघडताना दिसत आहे. अरबाज खानने तिला हा आंब्याचा बॉक्स भेट म्हणून दिला आहे. मलायकाने या स्‍टोरीवर लिहिले, ‘आंब्यांसाठी धन्यवाद अरबाज. आपण यास ऑनलाइन देखील ऑर्डर करू शकता.’ अरबाजने ही भेट केवळ मलायकालाच नाही तर तिची बहीण अमृता अरोराला देखील पाठविली आहे.

मलायकाला या गोड आंब्यांची भेट मिळाल्याने आनंद झाला आहे. अधिक माहिती म्हणजे अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे १८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जरी त्यांचे वेगळे होण्याचे खरे कारण उघड झालेले नाही, परंतु आता हे दोघेही आपापल्या जीवनात पुढे गेले आहेत. मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तसेच दुसरीकडे अरबाज देखील त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया सोबत व्यस्त आहे.

Leave a comment

0.0/5