Skip to content Skip to footer

८० कुटुंबांसह चाळमध्ये राहायचे ‘जितेंद्र’, घरामध्ये पहिल्यांदा पंखा आला तेव्हा पाहायला जमली होती गर्दी

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूडचे ‘जम्पिंग जॅक’ आणि बर्‍याचदा चमकदार पांढऱ्या कपड्यात दिसणार्‍या जितेंद्रने आपल्या काळात अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या मोहकतेचे आणि त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आज जितेंद्र जरी अलिशान बंगल्यात राहत असतील आणि त्यांच्याकडे मोठमोठी वाहने असतील, पण आजही त्यांना आपल्या चाळीतील आयुष्याची आठवण झाली की ते खूप भावूक होतात. जितेंद्र हे ८० कुटुंबांसमवेत एका चाळीत राहत असत आणि त्यांनी आपल्या आयुष्याची पहिली २० वर्षे मुंबईतील गिरगाव येथील चाळीत घालविली. इंडियन आयडल १२ च्या सेटवर आपली मुलगी एकता कपूरसोबत आलेल्या जितेंद्रने आपल्या चाळीशी संबंधित काही आठवणी सांगितल्या.

जितेंद्र यांनी सांगितले की, मला मराठी येत होती त्यामुळेच अभिनेता होऊ शकलो. त्यांनी सांगितले की ते अशा चाळीत राहत होते जी चार मजल्यांची होती आणि प्रत्येक मजल्यामध्ये २० कुटुंबे राहत होती. म्हणजे तिथे एकूण ८० कुटुंबे राहत होती. ते म्हणाले, “आम्ही खूप मिळून मिसळून राहत होतो. कधी-कधी आमच्या घरात चहा पावडर किंवा दूध नसले, तरी त्याची कमतरता भासत नव्हती, कारण गरज पडल्यास शेजारी जाऊन आणायची आणि नंतर परत करायची. जेव्हा आमच्या घरात पंखा लावण्यात आला होता, तेव्हा सर्व चाळीमधील लोक बघायला आले होते, कारण तेव्हा कुणाच्याही घरात पंखा नव्हता. ट्यूबलाइट देखील प्रथमच माझ्या घरात बसविण्यात आली होती.”

आपले जुने दिवस आठवताना ते म्हणाले, “ते माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते, बस एवढंच मी सांगू शकतो.” अधिक माहिती म्हणजे जितेंद्रने ‘तोहफा’, ‘सरफरोश’, ‘थानेदार’, ‘हिम्मतवाला’ आणि ‘धरमवीर’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Leave a comment

0.0/5