Skip to content Skip to footer

How To Feel Better: त्वरित मूड चांगला करायचा असेल तर ‘या’ पाच गोष्टींचे अनुसरण करा, दिसून येईल परिणाम

महाराष्ट्र बुलेटिन : आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाला तणावाचा सामना करावा लागणे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु हा तणाव जर आपल्या मनावर अधिराज्य गाजवायला लागला तर काय करावे? होय, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यात आपली इच्छा नसतानाही आपण ओढावले जात असतो. बर्‍याच वेळा खराब मनःस्थितीमुळे आपल्याला चांगल्या वेळेचा आनंद घेता येत नाही आणि आयुष्यात त्या खास क्षणांच्या आठवणी आपल्यासाठी निरर्थकच राहतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे नकारात्मक विचार करणे किंवा काहीतरी घडण्याचे किंवा न घडण्याचे दु:ख मनात बाळगणे हे आहे. अशा परिस्थितीत स्वत:ला सकारात्मक बनविणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच आम्ही येथे आपल्याला काही खास आणि अतिशय सोपे मार्ग सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही खराब मनःस्थितीतून स्वत:ला सावरू शकाल आणि स्वत:मध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण करू शकाल. अशा काही उपायांबाबत आज आपण जाणून घेऊया.

१. डीप ब्रीदिंग म्हणजेच दीर्घ श्वास घ्या

हा फॉर्मुला खूपच सायन्टिफिक आहे. दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते ज्यामुळे मेंदू रिलॅक्स होतो. जेव्हा मेंदूला आराम मिळतो तेव्हा फील-गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि आपल्याला अधिक चांगले वाटू लागते. त्याचे एक आध्यात्मिक महत्त्व देखील आहे.

२. म्युझिक

जर आपण खराब मनःस्थितीतून जात असाल तर आपण आपल्या मनाला आराम देणारे किंवा आपल्या मूडनुसार एक पॉझिटिव्ह लिरीक्सचे गाणे ऐकले पाहिजे. असे केल्याने आपल्या शरीरात एंडोर्फिन हार्मोन रिलीज होईल, जे आपल्याला चांगली अनुभूती देईल.

३. मोकळ्या हवेत जावे

जर आपण खराब मूडसह घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असाल तर ब्रेक घ्यावा. बाहेर निघावे आणि जवळपासच्या एखाद्या उद्यानात जावे, निसर्गाच्या सानिध्यात बसावे किंवा चालावे. आपण विंडो शॉपिंग देखील करू शकता. असे केल्याने आपल्याला बरेच फरक जाणवतील.

४. कुकिंग

कुकिंग ही एक अशी कला आहे जी आपल्या मनाला गुंतवून ठेवते. आपण आपल्या स्वयंपाकघरात जा आणि काहीतरी चांगला पदार्थ बनवा. तुम्हाला खूप छान वाटेल.

५. हसणे

नक्कीच हे एक कठीण काम असेल, परंतु आपण एकदा सर्वकाही बाजूला सारून हसलात तर ते आपल्यासाठी एका टॉनिकप्रमाणे कार्य करेल. आपण बाथरूमच्या आरशा समोर जाऊन स्वतःला पाहावे आणि स्वत:साठी हसावे आणि स्वत:ला विश्वास द्यावा की सर्व काही गोष्टी येतात आणि निघूनही जातात.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. Maharashtra Bulletin याची पुष्टी करत नाही. यावर अंमलबजावणीपूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधावा.)

Leave a comment

0.0/5