Skip to content Skip to footer

ब्रसेल्स: ‘अल्ला हु अकबर’ म्हणत दहशतवादी हल्ला

ब्रसेल्स – बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स येथे “अल्ला हु अकबर’ अशी घोषणा देत एका सैनिकावर हल्ला चढविणाऱ्या सुराधारी हल्लेखोरास गोळी घालून ठार करण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्लाच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

ब्रसेल्स येथे गेल्या वर्षी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या भागात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हा हल्लेखोर सुमारे 30 वर्षे वयाचा असून मूळचा सोमाली असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

https://maharashtrabulletin.com/donald-trump-intimates-pakistan/

बेल्जियम येथे दहशतवादीचा हल्ला झाला असतानाच लंडनमध्येही बकिंगहॅम पॅलेसजवळ पोलिसांनी मोठा सुरा घेऊन फिरत असलेल्या एका आरोपीस अटक केली. स्पेनमध्येही गेल्या आठवड्यातच घडविण्यात आलेल्या दहशतवादीचा हल्ल्यात 15 जण मृत्युमुखी पडले आहेत. याचबरोबर, फिनलंडमध्येही नुकताच अशा स्वरुपाचा दहशतवादीचा हल्ला घडविण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर एकंदर युरोपमध्येच सध्या अत्यंत तणावपूर्ण वातावरण असल्याचे मानले जात आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5