अंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा, वाचा याबाबत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र बुलेटिन : जर तुम्हाला सांगण्यात आले की पृथ्वीच्या बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे तर आपण काय प्रतिक्रिया द्याल? आश्चर्यचकित होऊ नका! काही वर्षांत अशी स्थिती आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. आता पृथ्वीच्या बाहेर अवकाशातही हॉटेल सुरू होणार आहे. वास्तविक, ऑर्बिटल असेंब्ली (Orbital Assembly) त्यावर काम करत आहे. ३ वर्ष जुनी ही कंपनी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत २०२५ पर्यंत यावर काम करण्यास सुरवात करेल. डेली मेलच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की २०२७ पर्यंत या हॉटेलचे काम देखील पूर्ण होईल.

या हॉटेलमध्ये वैयक्तिक पॉड्सला एका फिरत्या चाकाशी जोडण्यात येईल. वेगवेगळ्या भागातील ट्यूब्स एक्स (X) च्या स्वरूपात जोडले जातील. हे अशा प्रकारे जोडले जाईल की चाकाची धुरी याच एक्सलवर असेल. या हॉटेलमध्ये थीम असलेली रेस्टॉरंट्स, हेल्थ स्पा, सिनेमा हॉल, जिम, लायब्ररी, कॉन्सर्ट व्हेन्यू, पृथ्वीला पाहण्यासाठी एक लॉज, बार आणि खोल्या असतील. त्यामध्ये ४०० लोकांसाठी व्यवस्था असेल. या हॉटेलमध्ये क्रू मेंबर्ससाठी स्वतंत्र क्वार्टरपासून ते हवा, पाणी आणि विजेची उपलब्धता असेल.

वैयक्तिक मॉड्यूल खरेदी करण्याची देखील असेल संधी

ऑर्बिटल असेंब्ली याकरिता कायमस्वरूपी भागधारक म्हणून सरकारी संस्था शोधत आहे जेणेकरुन तिथे त्यांची प्रशिक्षण केंद्रे उघडता येतील. हे हॉटेल दर ९० मिनिटांनी ग्लोब ची एक फेरी पूर्ण करेल. जर एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल तर तो २०×१२ मीटरचे एक मॉड्यूल देखील खरेदी करू शकेल. हे एक प्रकारे त्याच्यासाठी प्रायव्हेट व्हिलासारखे असेल.

सध्या खर्चाविषयी काहीही माहिती समोर आलेली नाही

हे स्पेस स्टेशन एका मोठ्या वर्तुळाच्या आकारात असेल आणि ते कृत्रिम गुरुत्व निर्माण करण्यासाठी रोटेट देखील करेल. हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणासारखेच असेल. मात्र डेलीमेलच्या या अहवालात या हॉटेलवरील खर्चाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गेटवे फाउंडेशनचे संस्थापक जॉन ब्लिंकोव्हने यावर आपली प्रतिक्रिया देत सांगितले की, ‘ही पुढील औद्योगिक क्रांती असेल.’ या व्हॉयजरचा काही भाग गेटवे फाउंडेशनच चालवणार आहे.

रोबोटच्या मदतीने होईल तयार

STAR (Structure Trust Assembly Robot) नावाचा एक रोबोट याच्या प्रारंभिक आकारास तयार करेल. तथापि, यासाठी कंपनीला प्रथम गुरुत्वाकर्षण संबंधित चाचणी पूर्ण करावी लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here