Skip to content Skip to footer

स्वातंत्र्य दिनानिमित्त लंडन पोलिसांचे भारताला अनोखे गिफ्ट

नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनानिमित्त लंडन पोलिसांनी भारताला एक अनोखी भेटवस्तू दिली आहे. १२ व्या शतकातील कांस्य बुद्धांची मूर्ती भारताला भेट स्वरूप देण्यात आली आहे. बुद्धांची ही मूर्ती बिहारस्थित नालंदा येथील एका संग्रहालयातून जवळपास ६० वर्षाआधी चोरीला गेली होती.

नालंदा येथील भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण संस्थेमधून १४ मूर्त्यांपैकी बुद्धांची कांस्य मूर्ती १९६१ साली चोरीला गेली होती. लंडनमध्ये यावर्षी मार्चमध्ये झालेल्या एका व्यापारी संमेलनात ‘असोसिएशान फॉर रिसर्च इंटू क्राईम्स एगेंस्टच्या लिंडा अल्बर्टसन प्रोजेक्ट’चे विजय कुमार यांची नजर या मूर्तीवर पडली व याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी डीलर आणि मालकाला याबद्दलची माहिती दिली व मालकाने मूर्ती भारताला परत देण्यास संमती दिला.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त स्कॉटलंड येथे आयोजित एका कार्यक्रमात बुद्धांची ही कांस्य मूर्ती भारताला सुपूर्द करण्यात आली.

Leave a comment

0.0/5