Skip to content Skip to footer

अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनकच

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यात काही सुधारणा झालेली नसल्याचं एम्सकडून थोड्या वेळापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे.

बुधवारी एम्सनं त्यांचं पहिलं मेडिकल बुलेटिन जारी केलं होतं. त्यात ते गेल्या 9 आठवड्यांपासून एम्समध्ये असून गेल्या 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती खालावल्याचं म्हटलं होतं.

अटल बिहारी वाजपेयी यांना सध्या Life Support system वर ठेवण्यात आलं आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, भाजपाध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे सध्या एम्समध्ये दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारे मेडिकल बुलेटिन जाहीर झालं आहे. त्यात ते व्हेंटिलेटरवरच असून त्यांची प्रकृती चिंताजनकच असल्याचं म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5