Coronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम

महाराष्ट्र बुलेटिन: ज्यांना कोरोनाची लस तर घ्यायची आहे, मात्र इंजेक्शनची भीती वाटते अशांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकांना लवकरच कोरोना व्हायरस लसीमध्ये इंजेक्शनऐवजी टॅब्लेट मिळू शकते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी यावर काम सुरू केले आहे. शास्त्रज्ञांची टीम कोरोना विषाणूच्या अशा लसीचा शोध घेत आहे, जी मुलांना फ्लू मध्ये दिल्या जाणाऱ्या नाकाचा स्प्रे किंवा पोलिओ लसीकरणात दिल्या जाणाऱ्या टॅब्लेटप्रमाणे असेल.

ज्यांना इंजेक्शन्सची भीती वाटते केवळ त्यांच्यासाठीच ही दिलासाची बातमी नाही तर यामुळे जगभरातील लसीकरण मोहिमेला गती मिळेल. याव्यतिरिक्त योग्य तापमानावर स्टोअर करण्याचा त्रासही कमी होईल. प्रोफेसर गिल्बर्ट म्हणाले की कोरोना विषाणूचा नाकाचा स्प्रे आणि टॅब्लेट लस तयार होण्यास अद्याप थोडा वेळ लागेल कारण सर्वप्रथम त्यांची सुरक्षा आणि एफीकेसी टेस्ट करावी लागेल.

प्रोफेसर गिल्बर्ट म्हणाले, “इंजेक्शनच्या तुलनेत नाकाचा स्प्रे आणि टॅब्लेट लसीपासून मिळणारा इम्यून रिस्पॉन्स थोडा वेगळा असेल, परंतु त्याचे फायदे अधिक असतील. म्हणून, आम्ही भविष्यात लस देण्याच्या अजून वेगवेगळ्या पद्धतींवर विचार करू.”

गेल्या महिन्यात, एका ब्रिटीश बायोटेक कंपनीद्वारे करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये माकडांना देण्यात आलेल्या कोरोना विषाणूची ओरल व्हॅक्सिन अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले. कॅलिफोर्नियास्थित कंपनी इम्यूनिटीबायोने ब्रिटनमध्ये याबाबत चाचणी करण्यासाठी रेगुलेटरी मान्यता मागितली आहे. या टॅब्लेटची क्लिनिकल चाचणी जानेवारीपासून अमेरिकेच्या लोकांवर सुरू झाली आहे. त्याच वेळी, ब्रिटनमध्ये नाकाच्या स्प्रे ची चाचणी सुरू आहे. अ‍ॅनिमल स्टडीमध्ये सकारात्मक डेटा मिळाल्यानंतर यूके मेडिसीन्स आणि हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेगुलेटरी एजन्सीद्वारे या चाचणीस मान्यता देण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here