Skip to content Skip to footer

पहाटे तिकीट काढून अजित पवारांचा पुणे मेट्रो प्रवास

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सकाळी पहाटे पिंपरी चिंचवड येथी संत तुकाराम मेट्रो स्थानकाला भेट दिली. अजित पवार सकाळीच भेट देत असल्यामुळे मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आधीच सर्व तयारी करून ठेवली होती.

यावेळी अजित पवारांनी आज पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. या दरम्यान धावत्या मेट्रोत पवार यांनी चक्क तिकीट काढून प्रवास केला. पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरीपर्यंतच पहिला प्रवास केला. मेट्रोच्या रस्त्यातील काही झाडं काढली जाणार आहेत, त्यांचे पुनर्रोपण कसे केले जाणार याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली.

यावेळी अजित पवार हे मेट्रोचालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. पाहणी दौऱ्यात मोजके पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते. मेट्रोसंदर्भात अजित पवार यांनी काही सूचनादेखील केल्या असून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Leave a comment

0.0/5