Skip to content Skip to footer

…तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ ! – शिवसेना आमदारांचा इशारा.

…तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ ! – शिवसेना आमदारांचा इशारा.

औरंगाबाद शहरातील कलेक्टर ऑफिस, चांदणे चौक येथे काल अतिशय संतापजनक प्रसंग घडला. संचारबंदीच्या काळात सुरक्षा बंदोबस्तासाठी गस्त घालत असलेल्या पोलिसांवर एका टोळक्याकडून हल्ला केला. पोलिसांनी विनाकारण बाहेर का फिरत आहात, तुम्हाला परिस्थितीचे गांभीर्य नाही का ? असे सवाल विचारताच या टोळक्यातील इसमांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हुज्जत घालणाऱ्या टोळक्यातील काही इसमांनी पोलिसांना शिव्या देऊन त्यांना धमकी देण्याची भाषा देखील वापरली. त्यानंतर पोलिसांनी देखील हुज्जत घालणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी लाठीचा वापर केला असता, पोलिसांचीच लाठी हिसकावून या टोळक्याने पोलिसांवर हल्ला केला.

त्यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तेथून पळ काढणाऱ्या हल्लेखोरांच्या गाडीचा नंबर प्लेटचा फोटो काढला. त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

तर-शिवसेना-स्टाईलने-उत्त-So-Shiv Sena-styled-Utt

यासर्व प्रकारची माहिती औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या पर्यंत पोहचताच त्यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या जखमी पोलिसांची भेट त्यांनी घेतली. तसेच पोलिसांवर हात उगारणाऱ्या व पोलिसांशी अरेरावी वर्तन करणाऱ्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांचा इशारा असलेली एक पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल ही होत आहे.

Leave a comment

0.0/5