Skip to content Skip to footer

सोमय्यांच्या खोट्या ट्विटवर मुंबई पोलिसांचा खुलासा…!

सोमय्यांच्या खोट्या ट्विटवर मुंबई पोलिसांचा खुलासा…!

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ठाकरे सरकारचे वाभाडे काढण्यात आघाडीवर असणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर जुना विडिओ शेअर केल्याचे उघड झाले आहे. सोमय्या यांनी मुंबई पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याचा विडिओ शेअर केला होता. या महिलेला कोरोनामुळे श्वास घेण्यात अडचण येत होती. तरीही तिला बराच काळ रुग्णवाहिकेसाठी तिष्ठत उभे राहावे लागले, असे म्हणत सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मात्र, मुंबई पोलिसांनी यावर तात्काळ खुलासा करत माजी खासदार सोमय्या यांचा हा दावा फेटाळून लावला. मुंबई पोलिसांनी ट्विट करून म्हटले की, हा विडिओ आत्ताचा नसून १६ तारखेचा आहे. तसेच या महिला पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झालेला नाही. ती पूर्णपणे तंदरुस्त आहे. कृपया नागरिकांनी खात्री न करता विडिओ शेअर करु नयेत, असे मुंबई पोलिसांनी सोमय्यांना रिप्लाय देताना म्हटले. विशेष म्हणजे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनाही मुंबई पोलिसांचा हा रिप्लाय आवडला. आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलिसांचे हे ट्विट लाईक केले. तर मुंबई पोलिसांनी खुलासा केल्यानंतर सोमय्या यांनी संबंधित विडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हटवला.

Leave a comment

0.0/5