Skip to content Skip to footer

महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या एकत्रित महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव केला. या धक्क्यातून भाजप सावरत नाही तेच आता एका मित्र पक्षाने झटका दिला आहे. भाजपचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट घेतली आहे.

महादेव जानकर यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या ३ डिसेंबर रोजी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याजवळील व्हिएसआय इनस्टिट्युटमध्ये महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यामध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली. मात्र, ही भेट कशासाठी होती आणि चर्चेचा तपशील काय होता, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे असा दावा केला होता. नुकतेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडले आहे. पदवीधर निवडणुकीमध्येही भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली होती.

Leave a comment

0.0/5