Skip to content Skip to footer

मुंबई मनपाला मोठे यश ; १० दिवसात धारावीत एकही रुग्ण नाही !

मुंबई मनपाला मोठे यश ; १० दिवसात धारावीत एकही रुग्ण नाही !

कोरोनाच्या वाढत्या संकटात मुंबईतील हॉटस्पॉट बनत चाललेल्या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत अर्थात धारावीत मागील १० दिवसापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. ही धारावीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाचे रुग्ण मुंबईत सापडण्यास सुरुवात झाल्यापासून धारावीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पहिला रुग्ण सापडला आणि काही दिवसातच त्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाला होता. अत्यंत दाटीवाटीच्या धारावी सारख्या झोपडपट्टीत कोरोनाला रोखणे हे महानगर पालिकेसाठी आव्हानात्मक कार्य होते.

परंतु धारावीत कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या उपाय योजनांमुळे एप्रिल, मे आणि जूनमध्ये कोरोनाला रोखण्यात यश आले होते. धारावीत ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटमेंट या फॉर्म्युल्यामुळे कोरोनावर विजय मिळवणे शक्य झाले आहे, असे आता धारावीत व परिसरात बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5