Skip to content Skip to footer

केईएम रुग्णालयात कोविशील्ड लसीच्या चाचणीला आज पासून सुरूवात.

केईएम रुग्णालयात कोविशील्ड लसीच्या चाचणीला आज पासून सुरूवात.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पासून केईएम रुगणलायत कोविशील्ड लसीच्या चाचणीला सुरूवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी या संदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली होती. कोविशील्ड लसीची ही तिसऱ्या टप्यातील चाचणी आहे. आज तीन जणांना ही लस टोचण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच केईएम रुग्णालयातील कोविशिल्ड लसीच्या चाचणीसाठी एथिक कमिटीने मान्यता दिली होती. यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ स्वयंसेवकांच्या स्क्रीनिंगला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत लस घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या १३ स्वयंसेवकांचे स्क्रिनिंग रुग्णालयाकडून पूर्ण झाली असून १० जणांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. आजदेखील आणखी १० जणांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे.

तर आरटीपीसीआर आणि अँटिबॉडीज चाचणी निगेटिव्ह आलेल्या तीन स्वयंसेवकांना आज लस टोचण्यात येईल. लस दिल्यानंतर तिघांवर काही परिणाम होतो का, हे तपासले जाईल. एक महिन्यांने पुन्हा लसीचा दुसरा डोस दिला जाईल, अशी माहिती केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे

Leave a comment

0.0/5