Skip to content Skip to footer

‘नो मास्क नो एन्ट्री’ आता मास्क नसेल तर बस, टॅक्सी आणि रिक्षात नाही मिळणार प्रवेश

‘नो मास्क नो एन्ट्री’ आता मास्क नसेल तर बस, टॅक्सी आणि रिक्षात नाही मिळणार प्रवेश

राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा वाड्याला सुरवात झालेली आहे. त्यामुळे घरभर पडताना आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क वापरण्याचे आदेश प्रशासन आणि मनपाने दिलेले आहे. आता यापुढे जाऊन मनपा आयुक्त चहल यांनी बस, टॅक्सी आणि रिक्षात विना मास्क प्रवण न करून देण्याचे आदेश संबंधित विभगाला दिलेले आहे. त्यामुळे यापुढें मुंबईत प्रवास करताना मास्क वापराने बंधनकारक असणार आहे.

मनपा क्षेत्रातील सर्व कार्यालयाने, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी विना मास्क प्रवेश दिला जाणार नाही अशा आशयाचे फलक यापूर्वीच लावण्य्त आले होते. त्यापुढे जात आहे मनपा आयुक्तांनी सर्व बसेस, टॅक्‍सी आणि ऑटोरिक्षा यांना सुद्धा याच आशयाचे स्टिकर लावण्याचे आदेश दिले आहे. तसेच दिलेल्या नियमांचे काटेकोड पालन करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून मनपा शहरांमध्ये जनजागृतीचे काम करत आहे. मात्र तरीही नागरिकांमध्ये मास्क वापरण्याबाबत जनजागृती झालेली आदळून आली नव्हती याच पाश्वभूमीवर मनपाने विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाही करण्याची सुरवात केली होती.

Leave a comment

0.0/5