घाटकोपर लिंक रोड येथील उड्डाणपुलाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबईची वाहतूककोंडी कमी करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.ने घाटकोपर येथे दक्षिण बाजूस येण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन आज (सोमवारी) पार पडले. ६९३ मी लांब आणि १२ मी रुंद असा हा पूल आहे. २५ मे २०१८ रोजी या उड्डाणपुलाचे काम सुरु झाले होते. तसेच या बांधणीसाठी ३३ कोटी इतका खर्च एम.एम.आर.डी.ए ला आलेला आहे.
ठाणे, नवी मुंबई वरून दक्षिण दिशेने मध्य मुंबईकडे तसेच पश्चिम उपनगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना हा उड्डाणपुल फायदेशीर ठरणार आहे. कोरोनामुळे कामाला विलंब झाला असला तरी दिवाळी पूर्वी हा उड्डाणपुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे. या उद्घाटन सभारंभावेळी बोलताना मंत्री शिंदे म्हणाले की, अंधेरी घाटकोपर लिंक रोड या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालेलं आहे. या उड्डाणपुलामुळे होणारी वाहतूक कोंडी आता दूर होणार आहे. तसेच वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल.