Skip to content Skip to footer

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार, आयुक्त चहल यांचे आदेश

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार, आयुक्त चहल यांचे आदेश

मुंबई शहरात कोविड-१९ च्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई आयुक्तांनी दिले आहे. या आदेशानुसार येत्या ३१ डिसेंबर पर्यंत मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात येतील. यापूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आयुक्तांच्या आदेशांनुसार मुंबईत या वर्षाअखेरपर्यंत म्हणजेच ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंदच राहतील.

आज राज्यातील कोरोनाची स्थिती जरी नियंत्रणात असली तरी येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने या वर्षाअखेरपर्यंत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत मागच्या काही दिवसांत अचानक वाढलेल्या कोविड रुग्ण संख्येमुळे संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काहीच वेळात पालिका प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सविस्तर माहिती देण्यात येईल.

Leave a comment

0.0/5