अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, पालिका, पोलीस आणि आंबेडकरी संघटनांचे आवाहन

अनुयायांनी-चैत्यभूमीवर-य-Followers-on Chaityabhumi-ya

अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, पालिका, पोलीस आणि आंबेडकरी संघटनांचे आवाहन

मुंबईत दरवर्षी ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी चैत्यभूमी येथे दाखल होतात. मात्र यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी दादरच्या चैत्यभूमीवर येऊ नये. अनुयायांनी आपल्या घरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन पालिका, पोलीस अधिकाऱ्यांसह विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने गुरुवारी करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांची एक बैठक पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पालिका, पोलीस खात्यांच्या अधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन अनुयायांनी चैत्यभूमीवर न येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केले. तर अनुयायांनी चैत्यभूमी स्मारक, दादर (पश्चिम), मुंबई- ४०००२८ या पत्त्यावर पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन प्रतीक कांबळे यांच्या विश्वशांती सामाजिक संस्थेने केले आहे.

तसेच बोरिवली येथील गोराई परिसरातील दी ग्लोबल विपश्यना पॅगोडा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान बंद ठेवण्यात यावा, अशी विनंती पालिकेकडून संबंधितांना करण्यात आली होती. त्याची दखल घेत संबंधित संस्थेने या काळात पॅगोडा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here