Skip to content Skip to footer

शेतकऱ्यांच्या समर्थनात काँग्रेसचे मुंबई येथे आंदोलन

शेतकऱ्यांच्या समर्थनात काँग्रेसचे मुंबई येथे आंदोलन

सध्या देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहेत. त्यात आज मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. या बंदला नागरिकांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्यात आज काँग्रेसच्या वतीने रिगल सिनेमा जवळ कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते.

‘केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात जे तीन काळे कायदे केले आहेत. ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही तर त्यांच्यासाठी घातक आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली आहे, ती ‘वन नेशन वन मार्केट’ ते योग्य होते. त्याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना न्याय देत होती. आता यांनी दोन मार्केट या ठिकाणी आणले. शेतकऱ्यांचे पीक हे स्वत:च घेणार आणि शेतकऱ्यांना नाचवण्याच काम या कायद्याद्वारे होणार हे स्पष्टपणे दिसत आहे. या कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनात आम्ही देखील मुंबईमध्ये आंदोलन करत आहोत’, असे मत काँग्रेस मंत्र्यांनी मांडले आहे.

Leave a comment

0.0/5