Skip to content Skip to footer

राखी सावंतच्या करिअरला उतरती कळा; सलमानच्या भावानं केली लाखमोलाची मदत

ड्रामा क्विन राखी सावंत झाली बेरोजगार; निर्मात्यांनी काम देण्यास दिला नकार

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर निशाणा साधून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र यावेळी ती अभिनेता सोहेल खानमुळे चर्चेत आहे. काम मिळवून दिल्याबद्दल तिने सलमान खानचा भाऊ सोहेलचे आभार मानले आहेत. आज त्याच्यामुळेच मी पुनरागमन करु शकले असं ती म्हणाली आहे.

राखी सावंत सध्या बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये आपला ड्रामेबाज अंदाज दाखवताना दिसत आहे. बिग बॉस सुरु होऊन आता आठ आठवडे उलटून गेले आहेत. या शो आता फायनलच्या दिशेने आहे. मात्र सोहेलच्या मदतीमुळे तिला बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळाली. द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत राखीने या मदतीसाठी सोहेलचे आभार मानले.

ती म्हणाली, “गेल्या काही वर्षांपासून मी बेरोजगार आहे. माझ्या करिअरला उतरती कळा लागली आहे. जे काही थोडं फार काम केलं त्याचे पैसे लॉकडाउनमुळे अद्याप मिळालेले नाहीत. मी अनेक निर्मात्यांकडे काम मागितलं परंतु कोणीही मला काम दिलं नाही. दरम्यान मी सलमानचा भाऊ सोहेल खानला फोन केला अन् त्याच्याकडे मदत मागितली. त्याने मला बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळवून दिली. कधीकाळी याच शोमुळे माझ्या करिअरला गती प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा बिग बॉसमुळे मला काम मिळेल अशी अपेक्षा आहे.”

Leave a comment

0.0/5