Skip to content Skip to footer

सिद्धिविनायकाच्या दर्शन मर्यादेत वाढ

आता १ जानेवारीला दर तासाला ८०० जणांना दर्शन घेता येणार आहे.

नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराची दर्शनक्षमता वाढवण्यात येणार आहे. आतापर्यंत दर तासाला २५० भाविकांना दर्शन घेता येत आहे. आता १ जानेवारीला दर तासाला ८०० जणांना दर्शन घेता येणार आहे.

ज्या भाविकांनी ऑनलाइन सांकेतिक चिन्ह (क्यूआर कोड) आरक्षित के ले आहे, त्यांनाच एस. के . बोले मार्गावरील सिद्धी प्रवेशद्वार व काकासाहेब गाडगीळ मार्गावरील रिद्धी प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांनी सांके तिक चिन्ह आरक्षित केलेले नाही त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. आरक्षणाचे सांकेतिक चिन्ह अहस्तांतरणीय असून ते व्हॉट्सअ‍ॅपद्वारे, छायाप्रत किंवा स्क्रीनशॉटच्या स्वरूपात स्वीकारले जाणार नाही. ज्या भाविकांनी सांके तिक चिन्ह आरक्षित केले आहे. परंतु दर्शनासाठी येणे शक्य नाही त्यांनी आरक्षण रद्द करावे, अशी सूचना मंदिर प्रशासनाने केली आहे ; जेणेकरून अन्य भाविकांना दर्शन घेता येईल.

दर्शनाच्या वेळा

सकाळी ७ ते दुपारी १२, दुपारी १२.३० ते सायं. ७, रात्री ८ ते ९.

Leave a comment

0.0/5