Skip to content Skip to footer

स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिद्धेश रामदास कदम यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे

स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिद्धेश रामदास कदम यांनी  उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे

शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी सर्व राज्यभरात मोठया उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्पेर्धेचे आणि आरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना पक्षाकडून करण्यात येते. त्याच प्रमाणे युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश रामदास कदम यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना शाखेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप आणि मालाड विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना शाखेत नेत्र तपासणी, कान,नाक आणि घसा तपासणी, बालरोग चिकित्स, दंत चिकित्स, रक्तदाब, मोफत चष्मा वाटप, मधुमेह तपासणी, अस्थिरोग तपासणी, जनरल मेडिसिन व ECG अशा विविध तपासण्या एकाच आरोग्य शिबिरात करण्यात येणार आहे. तरी या आरोग्य शिबिराचा सर्व नागरिकांनी सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असे आवाहन युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी प्रभागातील जनतेला केले आहे.

Leave a comment

0.0/5