Skip to content Skip to footer

अभिनेता सोनू सूद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला

अभिनेता सोनू सूद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला

बेकायदेशीर बांधकाम करून तिथं हॉटेल थाटल्याचा आरोप अभिनेता सोनू सूद याच्यावर मुंबई महापालिका प्रशासनाने केला होता. या संदर्भात न्याय मागण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी बजावलेल्या नोटीस संदर्भात सोनूने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यातच आता सोनू सूदने राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. गेल्या आठवड्यात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता, मनपाने ऑक्टोबर २०२० मध्ये बजावलेल्या नोटीस आणि दिवाणी कोर्टाने बजावलेल्या आदेशाला आवाहन दिले होते. मनपाच्या कारवाईविरोधात सोनू सूदच्या इमारतीला १३ जानेवारीपर्यंत कोर्टाने अंतरिम संरक्षण दिले होते.

बेकायदा बांधकामप्रकरणी अभिनेता सोनू सूदला वारंवार नोटीस बजावण्यात आली. कारवाई देखील करण्यात आली. मात्र तरी देखील सोनू सूदनं कायद्याचं उल्लंघन करणं थांबवलेलं नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच असल्याचा दावा’ बीएमसीनं हायकोर्टात केलाय. तसंच सोनू सूदला कुठलाही दिलासा देऊ नये अशी मागणी देखील मनपाने केली आहे.

Leave a comment

0.0/5