Skip to content Skip to footer

मुंबई मनपाच्या ऐतिहासिक इमारतीत सफर करण्याचा मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना

मुंबई मनपाच्या ऐतिहासिक इमारतीत सफर करण्याचा मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना

ब्रिटिशकालीन बृहमुंबई महानगर पालिकेची मुख्य इमारत पर्यटकांसाठी आता खुली होणार आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही इमारत पर्यटकांसाठी खुली होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या.

या हेरिटेज वॉकच्या निमित्ताने अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बऱ्याच वर्षानंतर महापालिकेत आले होते. त्यामुळे या हेरिटेज वॉकच्या सोहळ्यापेक्षा अजितदादा पालिकेत आल्याचीच सर्वाधिक जास्त चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

पालिकेने हेरिटेज वॉक सुरू करून हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांसाठी खुला केला आहे. दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना पालिकेत येऊन हेरिटेज वॉक करता येणार आहे. त्यासाठी एक गाईडही ठेवण्यात आला आहे. या गाईडच्या मदतीने पर्यटकांना या इमारतीचा इतिहास जाणून घेता येणार आहे.

Leave a comment

0.0/5