Skip to content Skip to footer

भायखळ्याच्या राणी बागेत पेंग्विन बरोबर लज्जदार खाण्याचा आस्वाद

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पेंग्विन पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना आता लज्जतदार पदार्थ्यांचा आस्वादही घेता येणार आहे. पेंग्विन कक्षाच्या इमारतीमध्येच ५३३ चौरस मीटर जागेत सुरू होणार्‍या ‘कॅफेटेरिया’मुळे ही सुविधा मिळणार आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू होणार्‍या या उपाहारगृहाच्या माध्यमातून पालिकेला दरमहा साडेपाच लाखांचा महसूल भाडय़ाच्या स्वरूपात मिळणार आहे.

पालिकेने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीच्या मंजुरीनुसार करण्यात येणार्‍या कामांमध्ये प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ नव्याने एण्ट्री प्लाझा विकसित करण्यात आला असून यामध्ये तिकीटघर, प्याऊ, प्रसाधनगृह, सोव्हेनिअर शॉप, क्लोक रूम, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. २०१७ मध्ये आणलेल्या पेंग्विनमुळे येणार्‍या पर्यटकांची संख्या सुट्टीच्या दिवशी २० हजारांवर गेली आहे.

Leave a comment

0.0/5