Skip to content Skip to footer

दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते ‘मोहल्ला प्रीमियर लीग २०२१’ चे उद्घाटन.

शिवसेना उपशहर प्रमुख श्री.सलमान कौचाली यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता.

दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्याहस्ते ‘मोहल्ला प्रीमियर लीग २०२१’चे उद्धाघाटन झाले. त्या प्रसंगी योगेश कदम म्हणाले की,

“युवकांनी किमान एक तास तरी मैदानी खेळ खेळावेत. पहिले ध्येय खेड शहरामध्ये रिंग फुटबॉल व क्रिकेटसाठी फॅसिलिटी तयार करण्याचे आहे. खेळल्याने आरोग्य चांगले राहते, सध्याच्या काळात नवीन जीवनशैलीमुळे ताणतणाव निर्माण झाले आहेत. हा ताणतणाव खेळाच्या माध्यमातून नक्कीच कमी होईल.”
त्याचबरोबर जगबुडी नदी येथे ‘क्रोकोडाईल पार्क’ बनविणार असल्याची माहिती देखील उपस्थितांना दिली.
यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5