Skip to content Skip to footer

पालकमंत्री आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भेटीला, घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आज भेट घेतली. तसेच मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यांच्याशी तब्बल अर्धातास चर्चा केली. काल उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी भेटल्यानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले होते.

त्यात घराबाहेर मिळलेली गाडी चोरीची असल्याची माहिती समोर आली होती. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या हाती या प्रकरणी काही महत्त्वाची माहिती सुद्धा हाती लागली आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भेटीला पोहचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार गाडीतील व्यक्ती ही मागच्या सीटवरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या फुटपाथवर उतरली आणि वाकून पुढे निघून गेल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी निर्माण होत आहे. चेहऱ्यावर मास्कसह टोपी असल्याने त्या व्यक्तीची ओळख पटत नसल्याची माहिती मुंबई पोलिसांची दिली आहे. तसेच या घटनेमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सुरक्षेचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतल्याचं बोललं जात आहे.

Leave a comment

0.0/5