Skip to content Skip to footer

सलमान खानची ‘मेगा सेल्फी’ व्हायरल, एका फोटोत दिसले फिल्म इंडस्ट्रीमधील १५ कलाकार

महाराष्ट्र बुलेटिन : सलमान खान बॉलिवूडमधील एक आवडत्या स्टारपैकी एक आहे यात काही शंका नाही. अलीकडेच टीव्हीचा आवडता रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस १४ चा सीझन संपला आहे. या सीझनच्या फिनालेमध्येच सलमान खानने आगामी सीझनची घोषणा केली आहे. त्याचवेळी अलीकडेच सलमानला ‘इंडियन प्रो म्युझिक लीग’ चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनविण्यात आले असून या खास प्रसंगाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सलमान खानने हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताना लिहिले की, ‘यहां तो एक सेल्फी बनती है. यह द वर्ल्ड बिगेस्ट म्यूजिक लीग है. चल मेगा सेल्फी ले ले रे.’ सलमान खानच्या या फोटोमध्ये गोविंदा, सुनीता आणि टीना आहूजासह बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स दिसत आहेत. हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की २०२१ ची ही बॉलिवूडमधील सर्वात मोठी सेल्फी आहे.

अधिक माहिती म्हणजे ‘बिग बॉस १४’ झाल्यानंतर सलमान खानला आता या लीगचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनविण्यात आले आहे. या दरम्यानच सलमान खान सतत आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो. सलमान खानचे अनेक मोठे चित्रपट यावर्षी आणि येत्या २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहेत. यंदा ईदच्या निमित्ताने सलमान खान आपला ‘राधे’ चित्रपट प्रदर्शित करणार असून वर्षाच्या अखेरीस ‘अंतिम’ चित्रपटाचे शूटिंगही संपेल. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर सलमान खान ‘टायगर ३’ च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.

Leave a comment

0.0/5