Skip to content Skip to footer

‘खडकवासला’त २४ टीएमसी पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटक्षेत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २३.८४ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. खडकवासलापाठोपाठ पानशेत धरणही भरण्याच्या मार्गावर असून, तेथील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर गेला आहे. खडकवासलासह जिल्ह्यातील ८ धरणांतून रविवारी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १०.९० टीएमसी झाला आहे.
जिल्ह्यातील पवना धरणात ५६, वडीवळे ४०, मुळशी २५ आणि डिंभे धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कळमोडी १.५१ टीएमसी (१०० टक्के), चासकमान ७.३८ (९७.४२ टक्के), भामा आसखेड ५.८६ (७६.४० टक्के) आणि पवना धरणात ७.६२ टीएमसी (८९.५८ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
गुंजवणी धरण क्षेत्रात १० आणि नीरा देवघरला १८ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणीत २.२९ (६२ टक्के), नीरा देवघर ८.८९ (७५.८४ टक्के), भाटघर १७.५५ (७४.६७ टक्के) आणि वीर धरणात ९.१४ टीएमसी (९७.१८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी पाचपर्यंत ४ हजार २८० क्युसेक्स, मुळशी ३ हजार, कासारसाई शंभर, वडीवळे ९७०, चासकमान ५ हजार २७५, कळमोडी ६२८, वडज येथून ८७८, गुंजवणी १ हजार ३४० आणि वीर धरणातून ४ हजार ५६३ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले. जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी पाचपर्यंत उजनीत उपयुक्त पाणीसाठा १०.९० टीएमसी (२०.३५ टक्के) झाला आहे.

Leave a comment

0.0/5