Skip to content Skip to footer

आगामी निवडणुकीत मोदी की राहुल?; काय म्हणाले नारायण राणे.

पुणे | भाजपचे खासदार नारायण राणे एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. तेव्हा या कार्यक्रमावेळी राणेंची मुलाखत घेण्यात आली. आगामी निवडणुकीत मोदी की राहुल यावर उत्तर देत ते म्हणाले मोदीच.

मी नागपूरचा, नांदेडचा नाही, मी कोकणचा आहे. 2019ला मी काय करणार, कुठे जाणार, याची घाई आताच करू नका. माझा पक्ष विधानसभेची निवडणूक लढविणार हे मात्र निश्‍चित आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस आणि भाजप सारखेच आहेत. पण उद्धव आणि राज आम्हाला नको आहेत. भाजपशी माझे संबंध जुळवले असले, तरीही मी कोणाचा झालो नाही. माझा पक्ष स्वतंत्र आहे. माझ्याकडे कोकणातला म्हणूनच पाहावे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Leave a comment

0.0/5