Skip to content Skip to footer

Pune : पुण्यात 1 जानेवारी पासून हेल्मेटसक्ती

पुण्यातील वाढत्या वाहतूक समस्या आणि अपघातांना आळा बसविण्यासाठी आता येत्या 1 जानेवारीपासून वाहनचालकांना हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. त्यामूळे आता पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचा विषय चर्चेत राहणार आहे.

वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात हेल्मेटसक्ती हा विषय कायमच वादाचा विषय ठरलेला आहे. पुण्यात हेल्मेटसक्तीचे आदेश असूनदेखील पुण्यातील वाहनाचालक हेल्मेट वापर करणे टाळतात. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. अनेकदा प्रबोधनही झाले आहे असे असून देखील हेल्मेट वापर वाहनचालकांकडून होत नाही. परंतु आता 1 जानेवारी 2019 पासून पुण्यात हेल्मेटची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी ही माहिती दिली. येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुणेकरांना हेल्मेटसक्तीची भेट मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

पुण्यात 25 लाखांपेक्षा अधिक दुचाकी आहेत. त्या तुलनेत हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. ब-याचदा अपघातात दुचाकीस्वारांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कित्येकदा किरकोळ अपघात असतो, शरीरावरील जखमा ही गंभीर नसतात; पण डोक्याला मार लागल्याने दुचाकीस्वारांचा नाहक जीव जातो. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापरणे अनिवार्य आहे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान देशातील अनेक राज्यात हेल्मेट वापरले जाते. तर पुण्यामध्ये हेल्मेटसक्ती केली की नागरिक मात्र याला विरोध करताना दिसतात.

Leave a comment

0.0/5