Skip to content Skip to footer

अखेर ‘अवनी’ चे बछडे दिसले

यवतमाळ: ‘अवनी’ म्हणजे टी-1 वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आल्यानंतर तिच्या दोन बछड्यांची चिंता व्यक्त होत होती. मात्र आता एक दिलासादायक बातमी हाती आली असून अवनीचे बछडे सुखरुप असून पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाला ते दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.

नरभक्षक अवनी वाघिणीला शार्पशूटरने गोळ्या घालून ठार केल्यानंतर देशभरातून महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू होती. तसेच वाघिणीचे बछडे बेपत्ता असल्याने वनविभागाला धारेवर धरण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रात्रंदिवस काम करत होते. अखेर आज त्यांना विहिरगाव परिसरात रस्ता ओलांडत असलेले दोन बछडे दिसल्याचे सांगण्यात येत आहे. हे बछडे अवनीचे असल्याचा दावा ही करण्यात येत आहे. मात्र याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

दरम्यान, चंद्रपूरमध्ये जुनोना जंगल परिसरात दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. ट्रेनच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्राणीप्रेमींनी हा अपघात की शिकार? असा संशय उपस्थित केला आहे.

Leave a comment

0.0/5