Skip to content Skip to footer

Pune : हेल्मेटसक्ती साठी आरटीओचीही कारवाई, परवाना होणार निलंबित

पुणे: हेल्मेटसक्ती च्या पोलिसांच्या निर्णयावर वाद सुरू असतानाच आता प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) कारवाईचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. दंडात्मक कारवाईसह परवानाही निलंबित केला जाईल. इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुक पोलिसांचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

पोलिसांनी १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शहरातील हेल्मेटसक्ती विरोधी गट सक्रीय झाले असून त्याला कडाडून विरोध केला जात आहे. आता ‘आरटीओ’नेही हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीपुढे रस्ते अपघात नियंत्रणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला आहे. याअनुषंगाने या समितीने दिलेल्या सुचनांनुसार केलेल्या कारवाईचा आढावा राज्याच्या मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Leave a comment

0.0/5