Skip to content Skip to footer

पुणे मेट्रोच्या क्रेन दुर्घटनेत बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले : पहा विडिओ

पुणेपुणे महामेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट मार्गाच्या कामात मेट्रोचा क्रेन कोसळताना पुणे-मुंबई महामार्गावरून जात असलेली खासगी बस सहिसलामत मार्गस्थ झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले आहे. ही क्रेन बसवर कोसळली असती तर बसमधील 20 ते 25 प्रवाशांना आपल्या जीवास मुकावे लागले असते. त्यामुळे मेट्रोचे नियोजनशुन्य कामकाज पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.

पहा विडिओ :

https://www.facebook.com/saamanaonline/videos/1197181417106814/

मेट्रोचे पिलर उभे करताना शनिवारी अचानक दुपारी अडीचच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर क्रेन कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मेट्रोने नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे येणार्‍या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यात जीवितहानी झाली नसली तरी क्रेन कोसळण्यापूर्वी अवघ्या काही सेकंदातच एक खासगी बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होत होती. क्रेन जमीनीवर कोसळण्यापूर्वी काही सेकंदात बस पुढे गेल्याने बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. अन्यथा, मेट्रोच्या नियोजनशून्य कामकाजामुळे निष्पाप प्रवाशांवर आज संक्रांत कोसळली असती.

Leave a comment

0.0/5