Skip to content Skip to footer

मेट्रोकडून बॅरिकेड काढून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात

मेट्रोचे पिलर उभारण्यासाठी रस्त्यातील काही जागा मेट्रोकडून बॅरीकेड लावून अडविण्यात आली होती. काही ठिकाणचे पिलरचे काम पूर्ण झाल्याने बॅरिकेड काढून रस्ता मोकळा करण्यास मेट्रोकडून सुरुवात झाली आहे. पिंपरी ते स्वारगेट दरम्यान 540 मीटर तर वनाज ते रामवाडी मार्गावर 750 मीटर अंतरावरील बॅरिकेडस काढण्यात आले आहेत.

पुणे मेट्रोचे सुमारे 30 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील काम प्रगतीपथावर आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रो रस्त्याच्या मध्यभागातून जात आहे. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही लेनवरील प्रत्येकी 4.50 मीटर अंतरावर बॅरिकेडस लावण्यात आले आहेत. त्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गिकेवरील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनी समोरील 540 मीटर अंतरावरील बॅरिकेड काढण्यात आले आहेत. तर वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील गुजरात सोसायटी ते कृष्णा हॉस्पिटल, आनंद नगर मेट्रो स्टेशन ते आयडियल कॉलनी बस स्टॉप, आयडियल कॉलनी मेट्रो स्टेशन ते एरंडवणा पोलीस चौकी, गरवारे कॉलेज गेट ते सावरकर स्मारक येथील 750 अंतरावरील बॅरिकेड काढण्यात आले आहेत.

बॅरिकेड काढण्यात आल्यामुळे रस्त्यावरील जागा मोकळी झाली असून यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कामे पिलरच्या वरच्या भागात करण्यात येणार आहेत. त्यामुळे पिलरच्या खालची जागा वाहतुकीसाठी मोकळी करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5