Skip to content Skip to footer

भारताचे ‘वीर’ कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवलं

 वीर विंग कमांडर अभिनंदन भारतात दाखल झाले आहेत. संपूर्ण देशाच्या नजरा सकाळपासून वाघा बॉर्डरवर आहेत. वायुदलाच्या प्रतिनिधीमंडळाने विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानच्या ताब्यातून भारतात आणलं. अभिनंदनचं भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं. सकाळपासून लोकं अभिनंदन यांच्या स्वागतासाठी बॉर्डरवर पोहोचत होते. आज बिटींग द रिट्रीट रद्द करण्यात आली असली तर लोकांची गर्दी कमी झालेली नव्हती. भारताच्या या वीरला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अभिनंदन यांचा भारतीय वायुदलाला ताबा देण्यात आला. त्यानंतर त्यांचं मेडिकल चेकअप करण्यात आलं. अभिनंदनचं मिग 21 विमान बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या हल्ल्यात जमिनीवर पडलं. त्यानंतर अभिनंदन पाकिस्तानात जाऊन पडला. अभिनंदनने पाकिस्तानचं एक एफ-16 लढाऊ विमान पाडलं होतं.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांची बैठक

तिन्ही दलाचे प्रमुख आणि अजित डोवाल यांच्यासोबत आज भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांची बैठक होणार आहे.

अभिनंदनची वैद्यकीय तपासणी

विंग कमांडर अभिनंदन यांची आज पाकिस्तानातून सुटका होणार आहे. थोड्याच वेळात वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन भारतात परतणार आहेत. इस्लामाबादहून अभिनंदन यांना वाघा बॉर्डरकडे नेण्यात येतं आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर हवाई मार्गानं त्यांना दिल्लीला नेण्यात येईल.

अभिनंदनच्या कुटुंबीयांचं टाळ्या वाजवून स्वागत

अभिनंदन यांचे कुटुंबीय चेन्नईहून दिल्लीला पोहोचले. त्यावेळी ते ज्या विमानात होते. त्या विमानातल्या सगळ्या प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदनच्या कुटुंबीयांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं.

४ मार्चपर्यंत पाकची हवाई सीमा बंद

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याने पाकिस्तानने आपली हवाईसीमा ४ मार्चपर्यंत बंद ठेवली आहे. पाकिस्तानमधून कराची, पेशावर, क्वेटा आणि इस्लामाबाद यांच्यामध्ये मात्र हवाई वाहतूक सुरु राहणार आहे.

आज बिटींग द रिट्रीट नाही

आज बिटींग द रिट्रीट होणार नसल्याचं बीएसएफबीएसएफने म्हटलं आहे. विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेसाठी अटारी-वाघा बॉर्डरवर हालचाली सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानमधील भारतीय राजदुताने विंग कमांडरच्या सुखरुप सुटकेसाठी संपूर्ण कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतरची पुढची प्रक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात सुरु झाली आहे.

Leave a comment

0.0/5