Skip to content Skip to footer

World cup 2019 विराटने सांगितले विश्वचषकात नंबर 3 की 4 वर खेळणार

आयसीसी वन डे विश्वचषकाला अवघे काही महिने बाकी आहेत. इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या या विश्वचषकाचा हिंदुस्थानचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. याच दरम्यान हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहली कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटने विश्वचषकात चार नंबरवर फलंदाजीला उतरावे असे म्हटले होते. आता विराटने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या हैदराबामध्ये होणाऱ्या पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी विराटने याबाबत वक्तव्य केले आहे. विश्वचषकामध्ये कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार असल्याचे विराटने म्हटले आहे. मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम असून त्यामुळे माझ्या खेळामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे विराट म्हणाला. त्यामुळे विराट विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

गागुंली मात्र असहमत
दरम्यान, रवी शास्त्री यांनी विराटने चौथ्या क्रमांकावर खेळावे असे सुचवले असले तरी त्यांच्या या मताशी माजी कर्णधार सौरव गांगुली असहमत आहे. विराट कोहली नंबर तीनवर सर्वोत्तम खेळी करत आला आहे. हिंदुस्थानचे टॉप तीन फलंदाज रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली ही खरी ताकद आहे. त्यामुळे हा क्रमांक बदलल्यास हिंदुस्थानला नुकसान होऊ शकते, असे गांगुली म्हणाला.

Leave a comment

0.0/5