Skip to content Skip to footer

दुष्काळाच्या झळा : पुण्यात २५५ तर सोलापुरात ३०९ टँकर

दुष्काळाची  भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही भागात महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विभागातील दुष्काळी भागात जिल्हा प्रशासनातर्फे टँकरने पाणीपुरवठा केला जात असून सध्या पुणे जिल्ह्यात २५५ तर सोलापूर जिल्ह्यात ३०९ टँकर सुरू आहेत. विभागातील चार जिल्ह्यातील १८ लाख २५ हजार १३८ नागरिकांना आणि १४ लाख ४५ हजार ५४ पशुधनाला दुष्काळाचा फटका बसला आहे.

शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. मात्र, सूर्य चांगलाच तापला असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. परिणामी राज्यात काही ठिकाणचे तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता अधिक जाणवू लागली आहे.मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनची चाहुल गालते. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनच्या आगमनाला विलंब होणार आहे. पाऊस लांबल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागणार आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३०९, साताऱ्यात २६०, पुणे जिल्ह्यात २५५ आणि सांगलीमध्ये १९२ टँकरने दुष्काळ बाधितांना पाणी पुरवठा सुरू आहे. तर विभागातील टँकरची संख्या १,०१३ वर गेली आहे.
साताºयातील एकट्या माण तालुक्यात १०९ टँकर सुरू असून सोलापुरातील मंगळवेढ्यात ५७, सांगोला येथे ५५ आणि करमाळ्यात ४९ टँकर सुरू आहेत. तसेच पुणे जिल्ह्यात बारामतीमध्ये ४० इंदापूरमध्ये ४२ आणि पुरंदर व शिरूरमध्ये प्रत्येकी २९ टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. विभागातील ८६६ गावांना आणि ५ हजार ४५ वाड्यांना दुष्काळा फटका बसला आहे.
विभागातील टँकरची आकडेवारी :
पुणे : आंबेगाव २७, बारामती ४०, दौंड २४,हवेली १३, भोर ७, इंदापूर ४२, जुन्नर २१, खेड १३, पुरंदर २९, शिरूर २९, वेल्हा २, मुळशी ४.
सोलापूर : सांगोला ५५, मंगळवेढा ५७, माढा २९, करमाळा ४९, माळशिरस १८, मोहोळ २३, दक्षिण सोलापूर २५, उत्तर सोलापूर १८, अक्कलकोट १४, बार्शी २०, पंढरपूर १.
सातारा : माण १०९, खटाव ४२, कोरेगाव ३६, फलटण ३६, वाई ७, खंडाळा २, पाटण ६, जावळी १३, महाबळेश्वर ४, सातारा २, कराड ३.
सांगली : जत १०९, कवठेमहाकाळ १५, तासगाव १५, खानापूर १३,आटपाडी ३३,मिरज ५.

 

Leave a comment

0.0/5