Skip to content Skip to footer

पहिल्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नरला दुखापत!

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पहिल्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा अनुभवी आणि धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना अफगाणिस्तानबरोबर होणार आहे. पण या सामन्यात वॉर्नर खेळणार की नाही, याबाबत ऑस्ट्रेलियाच्या संघाने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्याचबरोबर त्याच्या वैद्यकीय चाचणीबद्दलही काही सांगण्यात आलेले नाही. दुखापतीमुळेच ऑस्ट्रेलियाला सोमवारी श्रीलंकेबरोबरच्या सराव सामन्यातही खेळता आले नव्हते.

पहिल्याच षटकात आऊट होणारा बेअरस्टो दुसरा, पहिला कोण जाणून घ्या…
विश्वचषकाची सुरुवात धडाक्यात झाली. पहिल्याच षटकात इम्रान ताहिरने इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोवला आऊट केले. पण विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात, पहिल्याच षटकात बाद झालेला बेसरस्टोव हा काही पहिला फलंदाज नाही.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावून चांगला डाव खेळला. त्यात आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने पहिलेच षटक फिरकीपूट इम्रान ताहीरच्या हातात चेंडू देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या सामन्याची सुरुवात एका फिरकीपटूने केली. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू असलेल्या ताहीरने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. त्याने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला माघारी पाठवत वर्ल्ड कपमधील पहिली विकेट घेतली.

विश्वचषकाच्या पहिल्याच षटकात बाद होणारा बेअरस्टो हा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशीच एक घटना 1992 साली घडली आहे. 1992 साली ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक खेळवला गेला. त्यावेळी पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होता. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियाचा क्रेग मॅकडरमॉट पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होता. आणि पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचे माजी सलामीवीर जॉन राइट यांना बाद केले होते. जॉन हे भारताचे प्रशिक्षकही राहिले आहेत.

Leave a comment

0.0/5