Skip to content Skip to footer

सावत्र बापाचे लाजिरवाणे कृत्य ; अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

मरकळ (ता. खेड) येथे सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पाेलिसांकडे तक्रार दाखल केली असून पाेलिसांनी आराेपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 7 जून पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी घडली. फिर्यादी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आराेपी आणि फिर्यादी महिला हे एकाच कंपनीत गेल्या दाेन वर्षांपासून दिवस आणि रात्रपाळीमध्ये काम करत हाेते. फिर्यादी महिलेचा आराेपीसाेबत मंदिरात विवाह लावून देण्यात आला हाेता. रविवारी आराेपी रात्रपाळी करुन घरी परतला. त्यावेळी मुलीची आई दिवसपाळीमध्ये कामाला गेली हाेती. घरात पीडित मुलगी आणि सावत्र वडील दाेघेच हाेते. घरात काेणी नसल्याचा फायदा घेत सावत्र बापाने मुलीवर बलात्कार केला.

मुलीची आई संध्याकाळी घरी आल्यानंतर पीडित मुलीने याबाबत तिला सांगितले. त्यानंतर आईने थेट आळंदी पाेलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पाेलिसांनी आराेपीला तात्काळ अटक केली. आराेपी हा मूळचा मध्यप्रदेशचा असून मुलीची आई अरुणाचल प्रदेश येथील आहे. आराेपीला काेर्टात हजर केले असता न्यायालयाने 7 जूनपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली.

Leave a comment

0.0/5