मावळ मध्ये कोरोनाला शिरकाव करू द्यायचा नाही – आमदार सुनिल शेळके यांचं मावळवासियांना आवाहन

मावळ मध्ये कोरोनाला शिरकाव-Zip the corona in the middle

मावळ मध्ये कोरोनाला शिरकाव करू द्यायचा नाही – आमदार सुनिल शेळके यांचं मावळवासियांना आवाहन

सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. मात्र या संपूर्ण संकटाच्या विरुद्ध राज्यसरकार खबरदारीने महत्वपूर्ण काम करत आहे. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून अनेक आमदार, खासदार व इतर नेते मंडळी नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचवत आहेत. त्यातच मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या बद्दल विशेष माहिती सध्या संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरत आहे.

लॉकडाऊनमुळे मावळ तालुक्यात आमदार या नात्याने त्यांनी मतदारसंघातील सर्व गरजूंना रेशन किट वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला, ज्याद्वारे त्यांनी आजपर्यंत सुमारे २० हजार कुटुंबांना हक्काचे रेशन दिले. त्यांनी लॉकडाऊनसाठी व कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात केलेल्या उपाययोजनांची आज संपूर्ण राज्यात चर्चा आहे.

हे सर्व कार्य करत असताना त्यांनी नागरिकांना ही मदत नसून माझे कर्तव्य आहे, असे सांगून त्यांची समाजाविषयी असलेली आपुलकीची प्रचिती दिली. आज मावळवासीयांकडूनही शासन व आमदार शेळके यांच्याकडून केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच नियमांचे पालन केल्यास मावळ तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here