डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाणेर बालेवाडीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम
महाराष्ट्र बुलेटिन: भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि महान शिक्षणतज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाणेर बालेवाडीमध्ये नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
प्रभाग क्र.९ बाणेर बालेवाडीच्या उपाध्यक्षा नैनाताई पोळ यांच्यामार्फत वडाच्या झाडाची रोपे सुपूर्त करण्यात आली होती. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरणीय समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला.
वनसंपदेवर मानवाची बरीचशी कामे अवलंबून असतात, त्यामुळे वृक्षारोपण करणे व त्यांचे संवर्धन होणे आज काळाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावावीत आणि निरोगी आयुष्य जगावे असे आवाहन नगरसेवक अमोल बालवडकर यांनी यावेळी केले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध कार्यकर्ते उपस्थित होते.