Skip to content Skip to footer

‘७० टक्के लसीकरणानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका’ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

राज्यातील कोरोणाची दुसरी लाट ओसरल्याने सगळ्यांचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कडे लागलेराज्यातील कोरोणाची दुसरी लाट ओसरल्याने सगळ्यांचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत असे समजून उमेदवारांची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचे कधीही पडघम वाजू शकतात म्हणून सगळे तयारीला लागले आहेत.

महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणुकांच्या बाबतीत भाकीत केले आहे. ते म्हणाले की “महाराष्ट्रात ७० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही”, असे त्यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राज्यातील लसीकरणाला आता चांगलाच वेग यायला लागला आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे प्रलंबित असलेल्या औरंगाबाद, मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने पुढील चित्र स्पष्ट केले आहे!

Leave a comment

0.0/5